अभंगांची गाणी

ओमश्रीश दत्तोपासक

‘टाइम्स म्युझिक’नं संत ‘संत कवयित्री’ या नावाची ध्वनिफित काढली. त्याला अभिजीत पेंढारकर यांचं संगीत असून, आरती अंकलीकर-टिकेकर आणि पं. शौनक अभिषेकी यांनी ते गायले आहेत. यातील आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेल्या ‘नामयाचे ठेवणे जनीस लाभले’, ‘विठोबा मला मूळ धाडा’ या जनाबाईंच्या रचना श्रवणीय आहेत. काही लोकप्रिय गायिकांनी गायलेले जनाबाईंचे लोकप्रिय अभंग पुढीलप्रमाणे – नाम विठोबाचे घ्यावे (सुप्रभात हल्याळकर, आशा भोसले); डोईचा पदर आला खांद्यावरी (आशा भोसले, अनुराधा पौडवाल, वाणी जयराम), सावळी ते मूर्ती (आशा भोसले, अनुराधा पौडवाल), का गे निष्ठुर झालासी (आशा खाडिलकर, उत्तरा केळकर), अनंत लावण्याची शोभा (अनुराधा पौडवाल, सुहासिनी नांदगावकर), दळिता कांडिता (आशा भोसले, संध्या राव), संतभार पंढरीत (जितेंद्र अभिषेकी, वाणी जयराम), येगं येगं विठाबाई (आशा भोसले, नीलाक्षी जुवेकर), धरिला पंढरीचा चोर (मालती पांडे, अनुराधा पौडवाल, ज्योत्स्ना हर्डीकर)

संत जनाबाईंचं गुणगान करणारी ‘जनी नामयाची रंगली कीर्तनी’ (माणिक वर्मा), ‘जनाई करिते हरिभजन’ (शकुंतला जाधव) ही भक्तिगीतंही गाजली. जनाबाईंना सुळाची शिक्षा देण्याचा कथाभाग ‘माळ पदक विठ्ठल विसरला जनी घरी’ या गीतातून आला. हे गीत माणिक वर्मा यांनी गायलं.

अभंग गायक अल्बम
अनंत लावण्याची शोभा सुहासिनी संतमालिका
अनंत लावण्याची शोभा अनुराधा पौडवाल दिंडी
अनंत ब्रह्मांडे उदरी गजानन पाटील अभंग
आळविता धाव घाली आशा भोसले जनी म्हणे देवा
आळविता धाव घाली उषा मंगेशकर गोड गोड तुझे नाव
आम्ही जावे कवण्या ठाया आशा भोसले जनी म्हणे देवा
का गे निष्ठूर आशा खाडिलकर चला जाऊया पंढरपुरा
का गे निष्ठूर उत्तरा केळकर हरि रंगी रंगले
खंडेराया तुज वाणी जयराम केशवराज गाऊ गिती
चला पंढरीसी जाऊ उषा मंगेशकर कान्हाई माझी
जनी म्हणे पांडुरंगा संध्या राव पंढरीचा महिमा
जनी म्हणे पांडुरंगा शिवराम वरळीकर गोविंद घ्या कुणी गोपाळ
जनी जाय पाणियासी किशोरी आमोणकर रंगी रंगला श्रीरंग
ज्याचा सखा हरी भीमसेन जोशी अभंगवाणी ३
डोईचा पदर आशा भोसले जनी म्हणे देवा
डोईचा पदर अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
डोईचा पदर वाणी जयराम केशवराज गाऊ गिती
तुळशीचे बनी आशा भोसले जनी म्हणे देवा
तुझे चरणी अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
दळिता कांडिता आशा भोसले जनी म्हणे देवा
दळिता कांडिता संध्या राव पंढरीचा महिमा
धरिला पंढरीचा चोर जानकी अय्यर
धरिला पंढरीचा चोर अनुराधा पौडवाल पंढरीची वारी
धरिला पंढरीचा चोर ज्योत्स्ना हर्डीकर संत नामदेव
नाम विठोबाचे घ्यावे सुप्रभात हुल्याळकर
नाम विठोबाचे घ्यावे आशा भोसले जनी म्हणे देवा
पक्षी जाय दिगंतरा अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
प्रेम भावे तुम्ही नाचा अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
पंढरपूर जग भीमसेन जोशी संतजन येती घरा
पुंडलिका पाशी अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
भजन करी महादेव जितेंद्र अभिषेकी दिंडी
माझा नामा अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
माझिये जननी आशा भोसले जनी म्हणे देवा
ये गं ये गं विठाबाई आशा भोसले जनी म्हणे देवा
ये गं ये गं विठाबाई नीलाक्षी जुवेकर अभंग
बोलो लागला शिवराम वरळीकर गोविंद घ्या कुणी गोपाळ
वाट पाहते मी डोळा अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
विठू माझा लेकुरवाळा आशा भोसले
सदाशिवाचा अवतार अनुराधा पौडवाल समाधीगायन
संत भार पंढरीत जितेंद्र अभिषेकी
संत भार पंढरीत वाणी जयराम केशवराज गाऊ गिती
सावळी ते मूर्ती आशा भोसले जनी म्हणे देवा
सावळी ते मूर्ती अनुराधा पौडवाल सावळी ते मूर्ती
हरी माझा गे व्ही. जी भाटकर पाण्या निघाली सुंदरी
हात निढळावरी आाशा भोसले जनी म्हणे देवा
0 Shares
जनी गाय गाणे रिविजिटिंग जनी