आज इंटरनेटच्या युगात विसोबा खेचर हे प्राचीन नाव टोपणनाव म्हणून वापरणार्या लेखकाचं कौतुक करावं तितकं कमीच. जवळपास सात-आठ वर्षांपूर्वी ‘कळते समजते’ आणि ‘बातमीदार’ या ब्लॉगमधून मराठी पत्रकारितेवर खुमासदार लिहिणार्या विसोबा खेचरानं लक्ष वेधून घेतलं होतं. हा विसोबा खेचर नेमका कोण, हे तेव्हा गुलदस्त्यात होतं. हसवत हसवत चिमटे घेणारा विसोबा खेचर म्हणजे आता ‘लोकसत्ता’चे सीनियर एडिटर असणारे रवी आमले आहेत, हे गुपित राहिलेलं नाही. लोकांना शिकवणार्या संतांचा पण गुरू असतो हे विसोबा खेचरांमुळे माझ्या डोक्यात फिट्ट होतं. त्यामुळं पत्रकारांना शहाणपणा शिकवण्यासाठी हे नाव बरंय, असा विचार करून मी विसोबा खेचरांचं नाव घेतलं, असं रवी आमले सांगतात.
आमले यांनी विसोबाच्या नावानं ‘खट्टा मीठा’, ‘लेट्स भंकस’ असे ब्ल़ॉगही चालवले होते. ‘खट्टा मीठा’मध्ये इतिहासातली धक्कादायक पानं आजही वाचता येतात. तर ‘बेस्ट ऑफ भंकस’ या ब्लॉगवर विसोबाच्या जुन्या पोस्टींमधल्या निवडक वाचता येतात.
मराठी नेटिझन्समध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकप्रिय असलेल्या चर्चा कट्ट्यावर सदस्यांना लिखाणासाठी टोपण नाव घ्यावं लागायचं. त्यात विसोबा खेचर नावाचा एक लेखक होता. त्या विसोबाच्या लिखाणातही खूप छान माहिती असायची. तो विसोबा बहुदा अमेरिका/इंग्लंडमधला असावा.
चक्री भजनातून विठ्ठलभक्ती चळवळीचा ‘गुगल मॅप’