संत जनाबाई. एक बाई. सातशे वर्षांपूर्वीच्या. त्यात शूद्र. काम तेही मोलकरणीचं. असं सगळं असूनही त्यांनी वारकरी क्रांतीचं नेतृत्व केलं. भक्तीची व्याख्या बदलवली. कसदार साहित्य रचलं. स्त्रीमुक्तीचा हुंकार भरला. त्यामुळे सात शतकं महाराष्ट्रातल्या बायाबापड्या आपली दुःख जनाईशी शेयर करत राहिल्या.
डाउनलोड