रंग भरल्या जगण्यातलं समयाचं सुभाषित

भास्कर हांडे

संत सावता माळी कसे दिसायचे, याची कोणतीही खूण शिल्लक नाही. मग सावतोबांना शोधायचं कुठं? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे यांना ते शेती मातीत राबणा-या वारकरी माळक-यात सापडले आणि रिंगणच्या कवरवर अवतरले.

महाराष्ट्राच्या दृष्टीनं तेरावं शतक वैचारिक उत्थानाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. सावता माळी यांच्या कार्याचा आपण आढावा घेतो त्यावेळी आपणास कळून चुकतं की, मानवतेचा मानदंड स्थापित होताना कोणतं माप वापरलं जात होतं. आजमितीला त्या विचारांची परीक्षणं करणं कितपत शक्य आहे, हेसुद्धा आजमावून पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सात शतकानंतर संत सावता माळी यांचा चेहरा महाराष्ट्रातल्या विचारधारेनं पूर्ण बदलून त्याला वृद्धावस्थेला आणलंय. विचारांच्या बाबतीत मुख्य धारेतील संत म्हणून संत सावता टिकून आहेत. त्यांचं टिकून राहणं, हे पंचतत्त्वातल्या पाण्यासारखं आहे. निर्मळ, वाहतं आणि असेल त्या अडथळ्याला पार करून पुढं वाहत राहणं, थांबणं, तळंकरणं, एका संचिताप्रमाणं साठणं आणि तळपूर्ण भरल्यावर पुढं जाणं. द-या खो-यातून नदी जशी वाहत राहते तसं पुढं जाऊन सागराला मिळणं, सागर हे मानवतेचं रंगरूप किंवा रूपरंग.

पाणी गुणतत्त्व. धरतीचं अस्तित्व. जिवंत अनुभव. हिरव्या पानात दडलेला श्वास. पाणी आणि हवा एकत्र होते, तेव्हा आर्द्रता भरलेलं हवामान उल्हासि तकरतं. तसाच समाज आणि विचारयांच्या आल्हादित वातावरणाचा काळ आपणास आजमितीला आजमावता येतो. हे हवामान सदैव राहीलच, याची ग्वाही देणं शक्य होत नाही. हे आज अवतीभवती पाहिल्यावर लक्षात येत राहतं. तरीही उत्थान काळ काय असतो, याची ओळख आपल्याला संतांच्या कार्यातून समजते.

सावता महाराज यांचा जन्म १२५० मध्ये झाला तर १२९५ मध्ये त्यांचा मृत्यू. अवघा ४५ वर्षांचा काळ. त्यांचं चित्र काढण्यासाठी संदर्भ जमा करत असताना मला नेहमीप्रमाणंच प्रश्न पडला की, विविध संदर्भामध्ये सापडणारी त्यांची सगळी चित्रं वयस्कर का आहेत? सावता महाराजांचा देहवृद्ध माणसासारखा झाला होता का? नाही. त्यांचं निधन पंचेचाळीसाव्या वर्षी झालं, तेव्हा ते कसे दिसत होते, हे सामान्य जनकल्पना करू शकतात. विचारी माणूस निदान शंका उपस्थित करू शकतो. आधारभूत संदर्भ चाळताना या शतकातील तंत्र हे काम करू शकत नाही. विज्ञान इतकं चिकित्सक झालं आहे आणि तंत्रही प्रगत झालं आहे की, डीएनएवरून माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं रूप कसं असेल, त्याची प्रतिकृती तयार केली जाते; मात्र सावता महाराजयांचा डीएनए सापडणार कुठं?

मोट, नाडा, नाडी, डोण, थारोळ्या काठीचे दगड ज्यांना त्यांनी स्पर्श केला, जी अवजारे शेतात लागवडीसाठी वापरली, अंगाखांद्यावर घेतलीती सर्व काळाच्या ओघात नष्ट झाली. शेतातला भाजीपाला, फळं, फुलं तर नाशवंत. ती तेव्हाच फस्त केली गेली. निशाणी फक्त विहीर आहे. ती खोदताना त्यांचा घाम वाहिला. दगड असतील अवती भवती; पण उपरोधापोटी सांगायचं, तर आपल्या घरांची पायाभरणी करण्यासाठी तेही लोकांनी वाहून नेले असतील. क्षुल्लक सुद्धा काही शिल्लक नसेल, जशी उद्ध्वस्त धर्मशाळा.

अशा परिस्थितीत सावता महाराजांचं व्यक्तिचित्र कसं असेल, याचा विचार मनात घोळ घालतो. मग वारीतल्या शेतक-यांचे असंख्य चेहरे समोर येतात. वारीतील जनतेला भाजीपाला पुरवणारा शेतकरी समोर येतो आणि मग सावता महाराज स्पष्ट दिसू लागतात. भाजीपाल्यानं कांदा, मुळा इत्यादी नं भरलेली पाटी खांद्यावर घेऊन अंगात चिखलानं माखलेली कोपरी घातलेला शेतकरी, जोंधळ्याच्या शेतामधून बांधाबांधानं चालत जाणारा माळी, माळकरी, वारकरी, शेतकरी अशा सर्व नामानं संबोधलेला संत सावता!

माणूस शेती करू लागला त्यावेळेपासून सावता महाराज यांचा काळ कल्पिला तर? हा प्रश्नमी स्वत:ला विचारला. भारत देश शेतीप्रधान म्हणून जगभर गणला जातो. १२५ कोटी लोकांची भूक भागवून अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे. सावता महाराजांचाच विचार अभंगरूपात आहे,
घटका आणि पळ। साधी उतावीळ।
वाऊ गातो काळ। जाऊ नेदी॥

प्रत्येक क्षण, पळ, घटकायांचा विचार करणाराच शेतकरी असतो, हे गुपित तेराव्या शतकात जपणा-या, शोधणा-या शेतक-याचा धर्मच काळसदृश असतो. नऊ शतकात दोन परकीय विचारांची आक्रमणं आघातपूर्ण शोषून भारत पुन्हा शेतीपुरस्कृत देश राहिला आहे. त्याचं श्रेय शेतकरी बांधवांनाच जातं.

माझा प्रश्न अनुत्तरीत न ठेवता त्याचा उहापोह कसा करणार, या विवंचनेत मी सावता महाराज हा केंद्रबिंदू मानून एक विश्व गोलाकार झोका घेतला, तर मी आजमितीला ज्या काळात जगतो आहे, त्याच्याविरुद्ध टोकाला इ.स. ३३० च्या आसपासच्या काळात जातो. म्हणजे ख्रिस्त पर्वात पोचतो. रामपर्व आणि कृष्णपर्वात शेतीपेक्षा गाय कुरणं, दूध दुभतं इत्यादीवरच जास्त भर होता. त्यात समुद्र किनारी वा डोंगरद-यां मध्ये राहणारा मानव मांसाहार भक्षक होता आणि आजही शाकाहार करणा-यांची संख्या अल्पसंख्यच आहे. जगातील मत्स्य व्यापार आणि मांस व्यापार पाहिला तर भाजीपाला व्यापार आणि उद्योग करणा-यांची संख्या नाममात्रच आहे, हे समजून घ्यायला हवं.

इ.स. ३३०च्या काळाचा आराखडा अशासाठी घेतला की, संत सावता महाराजांचा काळ आपल्याला माहीत आहे. तो म्हणजे १२५० ते १२९५. तेराव्या शतकाची शेवटची चार दशकं मानूयात. आज २०१९चं वर्ष. जवळपास सातशे पन्नास वर्ष उलटून गेली. काळ आपण आकड्यात मोजतो, कारण मानवी बुद्धीला तो आकलनीय आहे. पशु-पक्ष्यांच्या आकलनात हे नसतं. विचारप्रवृत्त परिस्थितीत सावता महाराजांचं शेती करणं, अन्नधान्य निर्माण करणं, पालेभाज्या पिकवणं आणि हे करत असताना संसार हा एक, धर्मनिष्ठित जगणं दुसरं आणि मानवनिष्ठित जगणं हे तिसरं अशा क्रमवारीत ख्रिस्त, मुस्लीम धर्मस्थापनेनंतर मानव वैचारिक आवर्तनांमधे सापडला होता.

भारतातलं दर्शन एका क्रमवारीत ठेवल्यावर भक्ती या दर्शनापर्यंत वाटचाल झाली होती. ती आठव्या शतकात हरिरूप, श्रीरूप, विठ्ठलरूप धारण करून शैव आणि वैष्णव विचारांचा संगम होत होता. त्याचं उत्तम उदाहरण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक नामवंत भक्त शैव आणि वैष्णव विचारांनी प्रेरित होऊन, लिंगायत आणि वारकरी संप्रदायानं उत्थान पावत होते. नामदेव, ज्ञानदेवांच्या अगोदर बसवेश्वर, विसोबा खेचर इत्यादी मंडळी विचारांची उधाणे आणत होते, तापवत होते आणि सावता महाराजांसारखे संत त्यात तावून सुलाखून ईश्वरनिष्ठा काय आहे, हे पटवून देत होते. मानवसेवा हाच धर्म आणि दैनंदिन जीवनकर्मात कसं शोधायचं, याचं मार्गदर्शन नाही तर अंत:प्रेरणेनं प्रात्यक्षिक करून सांगत होते.

जसं ख्रिस्त अत्याचा-याला माफी देत, राज्यकर्त्यांची, जुलूमकर्त्यांची मनं वळवत होता. तीच वेळ आणि काळ तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतेला अंधकारात ढकलणा-या कर्मकांडांच्या थैमानाला रोखण्यासाठी संत कार्यरत झाले होते. त्याचीच परिणती म्हणजे तेराव्या शतकातील संतांच्या कार्याचा मागोवा घेताना संदर्भ सापडतात. ख्रिस्त क्रूसावर चढल्यावर अडीच शेते तीनशे वर्षांनी त्याच्या विचारांचा पगडा जनमानसात सर्वत्र फैलावला. तो काळ माणसात मिसळला, असं म्हणता येईल. या पल्ल्या पल्ल्याच्या अवस्थांचा विचार करताना आज सावता महाराज यांचं व्यक्तिचित्र रंगवताना जे काही काळ बाधित विचार सामावले त्यांची एकत्रित मोट बांधण्याची सामग्री तयार झाली.
तसं पाहिलं तर गेल्या सात ते आठ वर्षात रिंगणच्या मुखपृष्ठासाठी संतांची व्यक्तिचित्र रंगविताना माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला अनेकांगी पण आलं. एकतर मी अनेक पातळ्यांवर विचार करतो. माझा नेहमीचा व्यवसाय, प्रवास, चित्र, मूर्त आणि अमूर्त अशा परिक्रमेत शब्द आणि रंग एकमेकांत मिसळतात. कधी मी रंगात बोलतो, तर कधी शब्दात रंगवतो. हे रिंगण असल्यासारखं झालं आहे.

प्रत्येक संताचं कार्य आजच्या समकालात प्रमाण मानून त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं रूप आमूलाग्र बदललं आहे. त्याची छोटीशी झलक म्हणजे मातीकाम करणारा गोरा कुंभार आणि समकालीन मातीची शिल्प घडवणारे कलाकार. जसं की, भांडी मातीची आहेत, रोजच्या उपयोगासाठी जेवणाची ताटं, वाट्या, तांबे यांचं आकार कार्यतेच आहे; पण मूळ माती ऐवजी धातू आले आहेत. तसंच सावता महाराज यांचं शेती पिकवण्याचं तंत्र तेचआहे. भाज्या, फळं, धान्यतेच आहे. पण समकालीन शेती या विभागात येणारे अनेक विषय स्वतंत्र विभाग बनून गेलेत. उदा. बागकाम, शेतीकाम, वनस्पतीशास्त्र, वनविभाग. बागकामाची महत्त्वाची बाब म्हणजे फुलं आणि वनस्पती यांची एकत्रित मांडणी. जगप्रसिद्ध ट्युलिप गार्डनची महती सारं जग ऐकून आहे. पंधराव्या शतकातील मुघल गार्डन जगभर प्रसिद्ध झालं आहे.

या बागेत माणसं विरंगुळा शोधण्यासाठी येतात. बागवानाचं म्हणजेच माळ्याचं काम बाग कशी फुलवायची, त्यातल्या झाडांची मशागत कशी करायची, याचं शास्त्र-तंत्र शोधणं आणि ते प्रत्यक्षात आणणं हे आहे. त्याची मुघल गार्डन आणि ट्युलिप गार्डन ही दोन उदाहरणं आहेत. बागेत ईश्वर दर्शन झालं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे आणि आपला देव भेटल्यासारखं वाटलं पाहिजे, हा सावता महाराजांचा संदेश आहे. तेराव्या शतकात सावता महाराजांचा मळा पाहण्यासाठी संत आले तसाच विठोबाही आला. प्रत्यक्ष सृजनात देवदर्शन होतं, हे सावता महाराज यांच्या कार्यातून पहावयास मिळतं.

प्रसन्न शेतक-याचं स्मित हास्य फुलांपानातून खुलत असतं. शेतात राबणारा त्याचा हात अनेक सजीवांना खुलवत असतात, वनस्पतींना हिरवा जर्द रंग बहाल करत असतात. जे सावता माळी बनून देव दर्शन घडवतात, त्या शेतक-याच्या जीवनात रंग असतात. त्याची प्रचिती मी गेली चाळीस-पंचेचाळीस वर्ष घेतो आहे. वयाचं बालपण, किशोर पण मातीच्या सान्निध्यात घालवलेलं असल्यानं ते स्मृतिआड जात नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव संत सावता महाराज यांचं चित्र रंगवताना सतत येत राहिला. एका शेतक-याचा जीवन काळ आणि त्याची उलाघाल‘ जा वेत्याच्या वंशा तेव्हा कळे ’असं संत तुकाराम यांनी म्हटलंय. त्याची अनुभूती येत राहते.

एक चित्रकार असणं, त्यात शेतकरी असणं आणि शब्दांची जोड असणंया विषयांचा मिलाफ एकत्रित माळरान फुलवतो, असंच वाटतं. निसर्गातल्या अनेक तत्त्वांचं एकरूप होणं, हीच ईश्वर धारणा आणि हेच ध्यान असू शकतं.

0 Shares
क-हेच्या काठावरून निरेच्या काठावर ज्ञानकर्माच्या मार्गाने जातभेदाच्या पलीकडे